''माझ्या आयुष्यातला पहिला शब्द कदाचित मराठीत नसल्या कारणाने,माझ्या ब्लॉग वरची पहिली कविता माझ्या मातृभाषेत लिहिण्याचा प्रयोग मी करत आहे ''.
असं वाटतं
असं वाटतं ,
तान्ह्या बाळा प्रमाणे खुदू-खुदू हसावं,
झर्झार्त्या झर्याबरोबर पुढे पुढे वाहावं,
उंच वृक्षाच्या गार सावलीत जरासं बसावं;
असं वाटतं बरच काही करावं...
असं वाटतं,
पक्ष्यांच्या थव्याबरोबर लांब उडून जावं,
सख्यांबरोबर उंच डोंगरावर चढावं,
वर-वर जाताच नभाशी भिडावं;
असं वाटतं खूप काही करावं...
असं वाटतं,
अनोळखी रस्त्यावर उगीचच चालावं,
थंडगार पाण्यात डूपकी मारून पोहावं,
मत्स्यांचा गर्दीत हरूनच जावं;
असं वाटतं भरपूर काही करावं...
असं वाटतं,
पतंगीवर बसून ढगांवर पोहचावं,
व ढगांवर बसून ब्रम्हांड पहावं,
हनुमानासारखं आपणही कधी सूर्याला खावं;
असा वाटतं बरच काही करावं...
असं वाटतं,
विमानातून उडी मारून वाऱ्यावरती झुलावं,
निवडुंगाचा शेतातही सुमानासारखं फुलावं,
समुद्राच्या लाटांवर आरामात लोळावं,
असा वाटतं खूप काही करावं...
असं वाटतं,
शतपावली करताना त्या चंद्रिकेला टकमक पहावं,
काळ्या आकाशातील नक्षत्रानसारखं आयुष्यात चमकावं ,
कितीही लांब गेलो तरीही आपल्या शहरात वसावं,
असं वाटतं, जीवनात हे सर्व काही मिळावं!!
-प्राची केरकर.
१४ जानेवारी,२०१२.(३१स्त डिसेंबर २०११.)
असं वाटतं
असं वाटतं ,
तान्ह्या बाळा प्रमाणे खुदू-खुदू हसावं,
झर्झार्त्या झर्याबरोबर पुढे पुढे वाहावं,
उंच वृक्षाच्या गार सावलीत जरासं बसावं;
असं वाटतं बरच काही करावं...
असं वाटतं,
पक्ष्यांच्या थव्याबरोबर लांब उडून जावं,
सख्यांबरोबर उंच डोंगरावर चढावं,
वर-वर जाताच नभाशी भिडावं;
असं वाटतं खूप काही करावं...
असं वाटतं,
अनोळखी रस्त्यावर उगीचच चालावं,
थंडगार पाण्यात डूपकी मारून पोहावं,
मत्स्यांचा गर्दीत हरूनच जावं;
असं वाटतं भरपूर काही करावं...
असं वाटतं,
पतंगीवर बसून ढगांवर पोहचावं,
व ढगांवर बसून ब्रम्हांड पहावं,
हनुमानासारखं आपणही कधी सूर्याला खावं;
असा वाटतं बरच काही करावं...
असं वाटतं,
विमानातून उडी मारून वाऱ्यावरती झुलावं,
निवडुंगाचा शेतातही सुमानासारखं फुलावं,
समुद्राच्या लाटांवर आरामात लोळावं,
असा वाटतं खूप काही करावं...
असं वाटतं,
शतपावली करताना त्या चंद्रिकेला टकमक पहावं,
काळ्या आकाशातील नक्षत्रानसारखं आयुष्यात चमकावं ,
कितीही लांब गेलो तरीही आपल्या शहरात वसावं,
असं वाटतं, जीवनात हे सर्व काही मिळावं!!
-प्राची केरकर.
No comments:
Post a Comment