Sunday, 14 April 2013

आठवणीचं एक पिंपळपान

                                          

" हे काही शब्द माझ्या कॉलेजसाठी ,
त्या कॉलेज मधल्या शिक्षकांसाठी -उत्कर्ष मॅम आणि ज्योती मॅम  ,
माझ्या कॉलेजच्या मैत्रिणींसाठी - शीतल काटकर  ,प्राची खळे,भाग्यश्री ,प्रतीक्षा ,रिद्धी  ,शलाका ,मानसी, आणि अवंती साठी… आय रेअली मिस यू  ऑल!"

मुंबईतले दिवस संपत आले होते आणि आज सुर्य कुठे उगवला कोणाच ठाऊक पण आज माझी जाग तब्बल सकाळी ८  वाजता झाली. आज म्हटलं आपण पार्ल्यातल्या स्वामी समर्थांच्या मठात जायचं. तसेच करून मी घरी परता -परता माझा विचार परतला आणि भवन्स कॉलेजची   मी वाट धरली .

   ३ वर्षानंतर जणू मी त्या रस्त्यावर परतली होती.  ३ वर्ष आधीची, माझी  ती रोजची वाट, आज  मला नवीन वाटत होती. रस्तातर तोच होता , वेगळा होता तो फक्त वेळ .
   गल्लीत घुसताच त्या रम्य आठवणी माझ्या डोळ्यासमोर आल्या. ते धावपळ करून प्रक्टीकॅल्सला जण मैत्रिणींशी मस्ती करणं ,एका हातात फ्रान्की आणि दुसऱ्या हातात जर्नल पकडत रिक्षा पकडणं  या सगळ्या आठवणी आजही खूप ताज्या होत्या . आज भवन्स मध्ये चालताना ती घाई नव्हती ,तर एक निवांत मन होतं . मैत्रिणींचा भोवाळ नव्हता पण फक्त आठवणीच होत्या .

आत जायच्या आधीच आपल्या वडिलांचे ऑफिस म्हणजेच ' इंडियन बँकेवर ' हक्काने लक्ष गेलं , तर ती आज आपली बैठी जागा सोडून बिल्डिंग मध्ये स्थापन झाली होती . कॉलेजच्या वोच्मनला पाहून आत जाऊ देतील नं ,अशी शंका मनात आली . पण आज माझ्या वाटेला कुणीही आलं नाही .


        लग्न झालेली मुलगी जशी माहेरी परतते , असा काहीतरी तो  अनुभव मला वाटला  . आत पाऊल पडताच त्या  भव्य मोठ्या वडाच्या झाडाने माझे स्वागत केले. त्यावर झुलणारी त्याची मुळं पाहून मलाही आपल्या मुळंजवळ आल्यासारखं वाटलं .  जातच मी  आमच्या कॅमपसमधल्या शंकराच्या मंदिरात गेले . त्या मंदिरात मिळणारी शांतता  मी आजही कधी कधी शोधत असते .नंतर मी केमिस्ट्री बिल्डिंग कडे वळताच तेथे केलेली मस्ती वं खाललेली  ओरड माझ्या कानी गुंजली.  माझे  बरेच प्रोफेसरज़ माझ्या समोरून चालत येत होते आणि मी प्रत्येकाला ओळखलं हे माझ्या  चेहऱ्यावरचं विनाकारण हास्य सांगत होतं .

     मी वाट कॉलेज ऑफिस कडे वळवली, मी त्यांना लांबूनच बाहेर येताना पाहिलं आणि मनातल्या मनात मी माझं इंट्रोडकशन तैयारच ठेवलं होतं. त्या माझ्या समोर सौम्य हास्य देत आल्या आणि त्यांनी मला ओळखलं हे मला पटलं ! आता 'त्या ' म्हणजे माझ्या मराठीच्या " उत्कर्षा  माल्या मॅम "

  "मराठीअसूनही  जुनियर कॉलेज मध्ये मराठी न घेणारी एक कॉन्वेंट  इड्यूकेटेड  मुलगी " - असं माझं अकरावितलं देफिनिशन होतं ! आणि आज हीच मुलगी साक्षात मराठीत हे सगळं लेहीतेय  ते फक्त माझ्या मराठींच्या बाईनमुळें !
   माझ्या जवळ येताच  तयांनी आपला मायेचा हात माझ्या पाठीवर फिरवला , त्या वेळी तयांना  एका मिटिंग मध्ये निघायचं  होतं , तर अर्ध्या तासात नक्की आरामात भेटायचं आश्वासन त्यांनी  मला दिलं.
         त्या वेळात मी आमच्या कॉलेज कॅन्टीन मध्ये गेले. मनात तर खायचं बरंच काही होतं ,पण एक  फ्रेश  लाईम सोडा  घेऊन भुकेलेल्या डोळ्यांने मी माझ्या मित्रमैत्रिणीना शोधत होते. एक तरी कुणीतरी दिसावं अशी आस लावून मी सगळीकडे पाहत होते.  आज माझ्याकडे वेळ होता , पोटात थोडीफार जागाही होती , खिशात  हजार -दोन हजार रुपये शिवाय दोन क्रेडीट कार्ड्स ही होते , पण आज माझ्याबरोबर तो ' शेझवान राइस '  शेयर  करायला एक साधं चिख पाखरू  ही नव्हतं !  या गोष्टीची मला फार खंत होती .

              सांगितल्या प्रमाणे मॅम ठीक दोन वाजता मला भेटल्या! येता येता तर त्यांने बाहेरचा पंखाही लावला.आणि  आम्हीं उभ्याच चार गोष्टी करत होतो . माझ्यासाठी तर त्या  माझ्या मराठीच्या बाई होत्या पण सर्वांसाठी तर त्या वाईस प्रिन्सिपल होत्या न ! शेवटी मॅमच बोलल्या " चल  बेटा आपण माझ्या कॅबिन मध्ये जाऊया "  एका आई प्रमाणे त्यांने मला धरलं आणि आम्ही त्यांच्या कॅबीन कडे आलो ! वर चमकत असलेलं  मॅमचं नाव पाहून मला फार अभिमान वाटला.
            दुपारचे २. ३०  वाजले होते ,त्या जेवल्या नव्हत्या आणि मला त्यांच्या तब्बेतीची काळजी वाटत होती .
शेवटी त्यांचावर एवढा स्ट्रेस तर होताच न !
   पण मॅम शेवटी मॅमच होत्या! त्या माझ्या आयुष्याची हौसेने विचारपूस करत होत्या . खरं सांगू तर मला ते फार आवडलं ! खरोखरच! त्यांनी माझी एक युवती ,एक विद्यार्थिनी आणि एक रायटर अशा तीनही रूपांची  वेगवेगळी चौकशी केली, माझ्या आयुष्याला अजून रंगीत कसं बनवता  येईल याचे सल्ले दिले .
  आपल्या आयुष्यातील उदाहरणे अगदी वेवस्तितपणे वापरून त्यांने मला , आपल्या  समाजाला हातभार लावायची जाणीव करून दिली. आणि त्या जे काही बोलत होत्या ते मला शंभर टक्के पटतही होतं !
निरोप घ्यायची  वेळ आली होती! त्यांनी मला व न विसरता माझ्या बाबांसाठीही आपलं विसीटइंग कार्ड दिलं !
  त्यांचा आशीर्वाद घेत , पुन्हा भेटण्याची आशा देऊन मी तेथून निघले.

    परतताना  मला वाटलं , आपला दगदगीचं  काम ,आपलं  लंच  , सगळी कामं सोडून मॅमने  आपल्या धावत्या  वेळेतला तासभर  मला दिला ! फक्त एका मंगलोरे हून आलेल्या एक्स स्तुडेएंट साठी!
कमालची गोष्ट होती ! आपल्या धक्का बुक्कीच्या मुंबईत आपल्याला वाळुन साधं सॉरी  बोलायचा वेळ नसतो आणि मॅमने तर मला पूर्ण एक तास दिला होता.  त्यांच्या  ह्या  स्वभावाने मला आश्चर्यचकित सोडून ठेवलं  आणि तोच स्वभाव मलाही जपावासा वाटला!
   मी नंतर ज्योती मॅमना भेटले  , ज्या स्वतः उत्कर्षा  मॅमच्याच विद्यार्थिनी होत्या ! १२ वी  चे पेपर तपासत असतानाही त्या मला एका हाकेवर भेटायला शिक्षकांच्या खोलीतून बाहेर आल्या !माझ्याशी  वीस एक मिंट बोलल्या !मला त्यांनी मनापासून छान अभ्यास करायला सांगितले .  त्यांच्यातही मी त्याच स्वभावाची सावली जाणवली !


                      हा दिवस खूपच  वेगळा होता. कॉलेज मध्ये घालवलेल्या त्या दोन  तासांनी मला बराच करी शिकवलं !
  मी निशब्द झाले आणि या आठवणीचं पिंपळ पान घेऊन मी घराकडे  परतले…….
 


















No comments:

Post a Comment